मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त गुरूवारी पिंपळेगुरवमध्ये कार्यक्रमाचे आयोजन

0
517

चिंचवड, दि. १८ (पीसीबी)  – पिंपरी चिंचवड मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समितीच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त गुरुवारी (दि. २०) शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात सायंकाळी सहा वाजता उद्घाटन समारंभ होणार आहे, अशी माहिती मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने पत्रकार परिषदेत मंगळवारी (दि. १८) देण्यात आली.

या पत्रकार परिषदेला मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समितीचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष अरूण पवार,‍ प्रभाग स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर, माधव मनोरे, मारुती बानेवार आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कामगार मंत्री संभाजी निलंगेकर पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, आमदार सूजितसिंह ठाकूर, सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा, पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, पीएमआरडीचे अध्यक्ष किरण गित्ते, आमदार महेश लांडगे, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात मराठवाडा भूषण जीवन गौरव पुरस्कार शिक्षण क्षेत्र डॉ. भाऊसाहेब जाधव, प्रशासकीय – मधुकर तेलंग, सामाजिक –  भूषण कदम, वैद्यकीय – डॉ. रमाकांत जोशी, वृक्षसंवर्धन अण्णा जोगदंड यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यानंतर डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे मराठवाडा मुक्ती संग्राम या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच कृष्णाई उळेकर यांचा मराठवाडयाची लोककला हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे.