Desh

ममतादिदी सद्दाम हुसैनसारखी; यह दिदीगिरी नही चलेगी!- विवेक ओबेरॉय

By PCB Author

May 16, 2019

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – पश्चिम बंगालमध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या ‘रोड शो’दरम्यान झालेला लाठीहल्ला व दगडफेक तसेच तिथे सुरू असलेल्या अटकसत्रामुळे पश्चिम बंगालमध्ये तणाव आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेता विवेक ओबेरॉय याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र डागलेय. त्याने ममता बॅनर्जींची तुलना थेट इराकचा हुकुमशहा सद्दाम हुसैनशी केली आहे.

भाजप कार्यकर्त्या प्रियांका शर्मा आणि दिल्लीचे प्रवक्ता तजिंदर पाल सिंग बग्गा यांना अटक झाल्यानंतर विवेक ओबेरॉय याने ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर टीका केली. ‘ममता दीदींसारखी स्त्री ज्यांच्याविषयी सर्वांच्या मनात आदर आहे, ती स्त्री अचानक सद्दाम हुसैनसाखी का वागतेय? ही लोकशाही इतर कुणामुळे नव्हे, तर या ‘डिक्टेटर दीदी’मुळे धोक्यात आहे. आधी प्रियांका शर्मा आणि आता तजिंदर बग्गा…यह दीदीगिरी नही चलेगी ! असे म्हणत त्याने ममता बॅनर्जींवर टीका केली