मनोहर पर्रिकरांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान मोदीसह भाजप नेते गोव्यात दाखल  

0
682

पणजी, दि. १८ (पीसीबी) – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे रविवारी निधन झाले. त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान मोदी  यांच्यासह भाजप नेते गोव्यात दाखल झाले आहेत. तर रविवारी रात्रीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गोव्यात पोहचले आहेत.   भाजपचे अनेक दिग्गज नेते पर्रिकरांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले आहेत.

२०१३ मध्ये मनोहर पर्रीकर यांनी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचे नाव  पहिल्यांदा  सुचवले होते. पर्रिकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  निवडवर्तीय म्हणून ओळखले जात होते. ते मोदींच्या खास मर्जीतील होते. पर्रिकरांनी गोव्यात चांगली कामे केली आहेत. त्यामुळे विरोधीपक्षदेखील त्यांचे कौतुक करतो. मोदींचे सरकार आल्यानंतर देशाच्या संरक्षणमंत्रीपदी मोदींनी मनोहर पर्रिकरांना संरक्षण मंत्रिपदाची संधी दिली होती.

दरम्यान, मनोहर पर्रीकर यांचा जन्म १३ डिसेंबर १९५५ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी आपल्या  राजकीय कारकीर्दीला सुरूवात  केली होती. ‘आयआयटी बॉम्बे’ येथून ‘मेटलर्जिस्ट’ विषयात पदवी मिळवली.  त्यानंतरही त्यांनी संघासाठी काम करणे सुरू ठेवले होते. संघाशी असलेली त्यांची जवळीक त्यांनी कधीही लपवून ठेवली नाही. संरक्षणमंत्रिपदावर असताना पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे श्रेयदेखील त्यांनी संघाच्या शिकवणुकीला दिले होते.