Pimpri

मनसे चेआंदोलन…

By PCB Author

January 20, 2022

पिंपरी दि. २०(पीसीबी) – निगडी चौकातील लोकमान्य टिळक यांचा पुतळा आहे त्याच जागी पुर्णाकृती पुतळा लवकरात लवकर सुशोभित करण्याची मागणी मनसे ने केली. त्यासाठी मनसे ने आंदोलन केले.

निगडी प्राधिकरण येथील मुख्य चौकातील सिग्नल जवळ लोकमान्य टिळक यांचा अर्धा पुतळा असुन आम्ही मागे अनेक वेळा पत्र दिले आहे की पुतळा आहे त्या च जागी पुर्णाकृती पुतळा उभारावा व परिसर सुशोभित करण्याची मागणी चे पत्र दिले आहे. निगडी मधील मुख्य चौकातील सिग्नल जवळ 24 वर्षापूर्वी लोकमान्य यांचा अर्ध पुतळा बसविण्यात आला आहे तेव्हा पासून निगडी प्राधिकरण मधील लोकांना या पुतळ्याविषयी आपुलकी चे नाते निर्माण झाले असुन निगडी प्राधिकरणाची मुख्य ओळख लोकमान्य टिळक यांचा पुतळ्यामुळे आहे. शहरात पालिका स्थापन झाल्यानंतर हा शहरातील पहिला पुतळा असुन,शहरात अनेक प्रकारचे मोठ मोठे विकास कामे झाले,अनेक मोठे पुतळे झाले पण या भागातील स्वातंत्र्यवीर लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष झाले आहे. तरी आपण लवकरात लवकर पुर्णाकृती पुतळा उभारावा व परिसर सुशोभित करण्यासाठी आज निगडी येथे आंदोलन करण्यात आले यावेळी प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे व मुख्य कार्यकारी अभियंता स्थापत्य रविंद्र पवार यांना देण्यात आले. या आंदोलनात सचिन चिखले, हेमंत डांगे, जगन्नाथ वैद्य, मयुर चिंचवडे, के के कांबळे, ओंकार पाटोळे, आशिष चव्हाण, भागवत नागपुरे,शंतनु चौधरी,प्रसाद मराठे,गणेश काळभोर, रोहित शिंदे, धनंजय देशमुख, नाना काळभोर,रोहन कांबळे उपस्थित होते.