मनसेला सोबत घेणार का? अजित पवारांनी काय दिले उत्तर 

0
3143

पुणे, दि. १५ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडी करण्याची चर्चा सुरु आहे.   ४८ पैकी ४० जागांवर आमचे एकमत झाले आहे. इतर ८ जागांसाठी चर्चा सुरु  आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (शनिवार) येथे सांगितले. तर मनसेला सोबत घेणार का ?, असा प्रश्न विचारला असता समविचारी पक्षांना सोबत घेऊन पुढे जाऊ, असे सांगत अजित पवारांनी अधिक  बोलण्यास नकार दिला.  

पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण समारंभासाठी उपस्थिती लावण्यासाठी पवार आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, निवेदिता माने यांच्या शिवसेनेतील प्रवेशाबाबत विचारले असता ते म्हणाले की, निवेदिता माने यांना राष्ट्रीय अध्यक्ष पद दिले होते. त्यांना पक्षाने सर्व काही दिले असताना त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र आमची तेथील जागेबाबत मित्र पक्षासोबत बोलणी सुरू होती, असे त्यांनी सांगितले.