मनसेला आघाडीत घेण्याचा राष्ट्रवादीचा काँग्रेससमोर प्रस्ताव

0
1008

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीमध्ये मनसेला सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव काँग्रेससमोर ठेवल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या प्रस्तावावर काँग्रेसकडून अद्याप सहमती दर्शवण्यात आलेली नाही. काँग्रेस या प्रस्तावावर कोणती भूमिका घेते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेला सोबत घेण्याची विनंती केली आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा अशा दोन्ही निवडणुकीत मनसेला सोबत घ्यायला हवे. शहरी भागात मनसेची चांगले वर्चस्व आहे. त्यांची संघटना मजबूत आहे. त्यामुळे त्याचा फायदा होऊ शकतो, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.

मुंबईत काही दिवसांपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीची आगामी निवडणुकीसंदर्भात बैठक बोलावली होती.  या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव ठेवला आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी या प्रस्तावाला समर्थन दिले. मात्र, काँग्रेसने अद्याप या प्रस्तावावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.