Pune

मनसेला आघाडीत घेण्याचा निर्णय झालेला नाही – शरद पवार

By PCB Author

July 28, 2019

पुणे, दि. २८ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे देशातील अनेक नेत्यांप्रमाणे मलाही भेटले. त्यांना आघाडीत घ्यायचे की नाही याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी  आज (शनिवार) येथे सांगितले. 

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर   काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात २४० जागांवर चर्चा झाली. उर्वरित जागांसाठी घटकपक्षांसोबत चर्चा केली जाईल असेही शरद पवार यांनी सांगितले. तसेच लवकर यासंदर्भातली घोषणा करु असेही, त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, अन्यथा बहिष्कार घालू अशी भूमिका मनसेने घेतली आहे. ती मला मान्य नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. बॅलेट पेपरच्या मागणीसाठी देशभरातील अनेक पक्षांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.