Pimpri

मनसेच्या पिंपरी-चिंचवड प्रभारीपदी किशोर शिंदे यांची निवड

By PCB Author

July 28, 2018

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रभारीपदी पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही निवड केली आहे.

किशोर शिंदे हे पक्षाचे राज्य सरचिटणीस आहेत. त्याचप्रमाणे पक्षाचे जनसंघटन व प्रचार प्रसाराचीही जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच पिंपरी-चिंचवडच्या प्रभारीपदीही त्यांची निवड करण्यात आली आहे. किशोर शिंदे हे पुणे महापालिकेचे मनसेचे माजी नगरसेवक आहेत. त्यांच्या या निवडीचे मनसेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले व इतर पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे.