Maharashtra

मनसेचे शांततेत आंदोलन तरीसुध्दा पोलिस करत आहेत कारवाई

By PCB Author

August 22, 2019

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राज ठाकरे यांची आज (गुरुवार) ईडीकडून मुंबईतील कार्यालयात चौकशी सुरु आहे. यामुळे मनसे सैनिकांनी दोन दिवसांपासून आक्रमक पवित्रा घेतला होता.

मात्र राज ठाकरे यांनी स्वत: शांत राहण्याचे आवाहन केल्याने मनसे सैनिकांनी खळखटायक न वापरता शांततेच्या मार्गाने ‘EDiot Hitler’ असे लिहिलेले काळे टी-शर्ट घालून राज यांच्यावरील कारवाईचा निषेध व्यक्त केला. तर कायदा-सुव्यवस्थेची स्थिती उद्भवू नये यासाठी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी सुरु केली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि ठाण्याचे मनसे शहर अध्यक्ष रवी मोरे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.  पोलिसांच्या या दडपशाहीमुळे मनसे सैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.