नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – पाच राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (शनिवार) पत्रकार परिषदेत जाहीर केल्या. देशातील मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि मिझोराम, तेलंगणा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पाचही राज्यांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ११ डिसेंबरला पाचही राज्यांची मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्यात येणार आहे.