मध्य प्रदेशात निवडणुकीसाठी संघाशी संबंधित कर्मचाऱ्यांची नियुक्ती नको; विरोधी पक्षांची मागणी

0
634

भोपाळ, दि. २९ (पीसीबी) – मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संबंधित सरकारी कर्मचाऱ्यांची मतदान आणि मतमोजणीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात येऊ नये, अशी मागणी राज्यातील सर्वच विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांनी भोपाळमध्ये बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत त्यांनी भाजप, काँग्रेस, बसपा, आम आदमी पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यावेळी संघाशी संबंधित हा मुद्दा विरोधी पक्षांनी उपस्थित केला.

संघाच्या शाखेवर जाणारे सरकारी कर्मचारी भाजपच्या बाजूने निवडणुकीमध्ये प्रभाव टाकू शकतात. त्यामुळे अशा  कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामापासून दूर ठेवण्यात यावे, असे  मार्क्सवादीचे राज्य सचिव जसविंदर सिंह यांनी सांगितले. ‘आप’नेही सिंह यांच्या मुद्द्याला पाठिंबा देत भाजपप्रती सहानुभूती असलेल्या कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवण्याची मागणी केली.