मध्य प्रदेशमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझरने हटवल्याने उदयनराजे आक्रमक

0
562

सातारा, दि.१३ (पीसीबी) –  मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझरने हटवण्याचा प्रयत्न केला असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या प्रकारामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली असून माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मध्य प्रदेशमधील पुतळा  पाडण्याचा प्रयत्न करून काँग्रेसने महाराजांबद्दलचे आपलं प्रेम दाखवलचं आहे. आता वेळ आहे शिवसेनेची!! त्यांना महाराज जवळचे वाटतात की सत्तेतला मित्र काँग्रेस?, असा सवाल करत भाजपने शिवसेनेवर टिका केली आहे.

स्मारक काढल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे काल हजारो शिवप्रेमींनी महाराजांचा पुतळा पुन्हा त्याच जागेवर विराजमान केला, त्याबद्दल सर्व मावळ्यांचे आभार! जय शिवराय! असंही उदयनराजेंनी फेसबुर पोस्ट करून म्हटले आहे.