मध्य प्रदेशमध्ये भाजप पिछाडीवर; ११६ जागांवर काँग्रेस आघाडीवर

0
805

भोपाळ, दि. ११ (पीसीबी) मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला  आज (मंगळवार) सकाळी   सुरुवात झाली आहे.  सुरुवातीचे कल पाहता या लढतीत भाजपा पिछाडीवर आहे. मध्य प्रदेशमधील २३० जागांपैकी ११६ जागांवर सध्या काँग्रेस तर भाजप ९९ जागावर आघाडीवर  आहे.

गेली १५ वर्षे सत्तेत असलेल्या भाजपसमोर मध्य प्रदेश कायम राखण्याचे मोठे आव्हान आहे. शेतकरी वर्गाची नाराजी, व्यापम घोटाळा हे मुद्दे भाजपला प्रतिकूल ठरले होते. गेल्या वर्षभरात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे शिवराजसिंह चौहान यांचे राजकीय भवितव्य ठरवण्यासाठी  येथे  कसोटी लागली आहे.