मध्य प्रदेशमध्ये बसपा ठरणार किंगमेकर; मायावतींनी आमदारांना दिल्लीत बोलावले

0
1523

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. दोघांच्या जागामध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे येते  बहुजन समाज पक्ष किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशमधील २३० जागांपैकी भाजप ११० जागांवर तर काँग्रेस ११० जागांवर आघाडीवर आहे. तर बसपा ६ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी आघाडीवर असलेल्या आमदारांना दिल्लीमध्ये बोलावून घेतले आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात सत्ता स्थापन करण्यास मायावतींची भूमिका निर्णायक ठरणार आहे.  

गेली १५ वर्षे सत्तेत असलेल्या भाजपसमोर मध्य प्रदेश कायम राखण्याचे मोठे आव्हान आहे. शेतकरी वर्गाची नाराजी, व्यापम घोटाळा हे मुद्दे भाजपला प्रतिकूल ठरले होते. गेल्या वर्षभरात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुखे शिवराजसिंह चौहान यांचे राजकीय भवितव्य ठरवणारी ही एक परीक्षाच म्हणावी लागेल.