मध्ये प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या मुलाकडे तब्बल ६६० कोटींची संपत्ती

0
339

भोपाळ, दि. १० (पीसीबी) – एकीकडे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर आयकर विभागाकडून छापेमारीवरुन राजकीय वातावरण तापलं असताना, दुसरीकडे त्यांच्या मुलाकडे 660 कोटींची संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. कमलनाथ यांचा मुलगा आणि छिंदवाडा मतदारसंघातून उमेदवार असणारे नकुलनाथ यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना आपली स्थावर आणि जंगम मालमत्ता जाहीर केली आहे. विशेष म्हणजे नकुलनाथ यांनी जाहीर केलेली संपत्ती कमलनाथ यांच्या संपत्तीपेक्षा पाचपट जास्त आहे. कमलनाथ यांच्याकडे 124.67 कोटींची संपत्ती आहे.