मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक; सट्टा बाजारात काँग्रेसची चलती

0
885

भोपाळ,  दि. २१ (पीसीबी) – मध्यप्रदेशात विधानसभा  निवडणुकांचा ज्वर शिगेला पोहचला आहे.  एक आठवड्यावर मतदानाचा दिवस येऊन ठेपला आहे. दरम्यान  सट्टा बाजारात  भाजप जिंकणार की काँग्रेस यावर अनेक जण सट्टा लावत आहेत. सुरूवातीला भाजपला सर्वांची पसंती मिळत होती. मात्र, आता सट्टा बाजाराची हवा बदली असून काँग्रेसला सर्वाधिक पसंती मिळू लागल्याने काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.  

आधी सट्टा बाजारात भाजपवर १ हजार  रुपये सट्टा लावल्यावर ११ हजार रुपये जिंकत होते. तर काँग्रेसवर सट्टा लावल्यावर १ हजार रुपये मिळत होते. भाजपच जिंकेल, अशी बाजारात चर्चा सुरू होती.  मात्र, मतदानाच्या एका आठवड्याआधी बाजारात वेगळे वातावरण तयार झाले आहे. भाजप जिंकेल यावर कमी लोक सट्टा लावत आहेत. तर काँग्रेसच्या विजयावर जास्त लोक सट्टा लावत आहेत.  काँग्रेसचा दर  अनपेक्षितपणे वाढल्यामुळे  काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

काँग्रेसला ११६ तर भाजपला १०२ जागा मिळण्याचा अंदाज सट्टा बाजाराने वर्तवला आहे. सट्टा बाजारातील अंदाजावर  निवडणुकांचा निकाल वर्तवणे कठीण काम आहे. मात्र,  सट्टा बाजारात गेल्या निवडणुकांच्या तुलनेत तेजीचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे.  मध्यप्रदेशात २८ नोव्हेंबरला मतदान होणार  असून  तर ११ डिसेंबरला  मतमोजणी आहे.