मध्यप्रदेशात भाजप नेत्याचा निर्घृण खून

0
595

भोपाळ, दि. २० (पीसीबी) – मध्यप्रदेशातील सेंधवा जिल्ह्यात एका भाजप नेत्याच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (रविवार) सकाळच्या सुमारास बलवाडी येथील पोलिस स्टेशनजवळून समोर आली.

मनोज ठाकरे असे खून झालेल्या भाजप नेत्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज ठाकरे आज सकाळी बलवाडी येथून मॉर्निंग वॉकला निघाले होते. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांनाजबर मारहाण करत डोक्यात दगड मारुन त्यांचा खून केला. त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा करण्यात आला आहे. एकाच आठवड्यात मध्यप्रदेशात भाजप नेत्याचा खून झाल्याची ही दुसरी घटना आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.