मध्यप्रदेशाच्या उपमुख्यमंत्रिपदी ज्योतिरादित्य शिंदे ?

0
523

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – मध्य प्रदेशमध्ये काँग्रेससमोर मुख्यमंत्रीपदाचा पेच निर्माण झाला आहे.  काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार पक्षाध्यक्ष  राहुल गांधी यांच्याकडे देण्यात आला आहे.  या  पार्श्वभूमीवर राहुल गांधी  आज (गुरुवारी) दिल्लीत  बैठक घेणार आहेत. यावेळी  मुख्यमंत्रिपदासाठी नवा फॉर्म्युला समोर ठेवला जाणार आहे. त्यामध्ये पक्षाच्या दुसऱ्या वरिष्ठ नेत्याला उपमुख्यमंत्री केले जाऊ शकते. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नावाची यासाठी चर्चा आहे.