Desh

मध्यप्रदेशमध्ये बलात्काराविरोधी संताप; आरोपींनी फाशीच देण्याची मागणी

By PCB Author

June 30, 2018

इंदोर, दि. ३० (पीसीबी) – सात वर्षाच्या मुलीबरोबर निर्भया कांडाप्रमाणे सामुहित बलात्कार आणि निर्घृण अत्याचार केल्याप्रकरणी दुसरा आरोपी आसिफलाही अटक झाली आहे. त्याने मुलीला एकटी पाहून तो आणि इरफान घेऊन गेल्याचे मान्य केले. या घटनेबाबत परिसरात प्रचंड आक्रोश आहे. अनेक ठिकाणी आंदोलने सुरू असून आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी. त्यापेक्षी कमी शिक्षा मान्यच नाही, अशी मागणी समोर येत आहे. आरोपी इरफानचे गाव रिंगनोदच्या लोकांनी तर फाशी झाल्यास त्याचा मृतदेह देखिल गावात दफन करू देणार नस्लायचे म्हटले आहे.

दुसरीकडे एमवाय रुग्णालयात दाखल चिमुरडीची प्रकृती गंभीर आहे. ती एवढी घाबरून गेली आहे की, डॉक्टर किंना नर्सने स्पर्श केला तर ती घाबरून जाते. प्रत्येकवेळी ती फक्त आईलाच बिलगुन असते. वारंवार ती फक्त हेच म्हणत आहे की, आई मला वाचव किंवा मला मारून टाक. तिला वेदना असह्य होत आहेत. उपचार करणारे डॉ. ब्रजेश लाहोटी यांनी सांगितले की, ऑपरेशनद्वारे दुखापतीवर उपचार केले आहेत. पण आता तिला इन्फेक्शनपासून वाचवण्याचे मोठे आव्हान आहे. मुलीच्या जखमा भरण्यास दोन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ लागणार आहे. तिच्या संपूर्ण शरिरावर पट्ट्या बांधलेल्या आहेत.

या प्रकारानंतर सर्वच स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मुलीच्या आजीने तर अत्याचार करणाऱ्या दोन नराधमांना फाशी देण्यापूर्वी तिच्या चिमुरड्या नातीला जशा वेदना झाल्या, तशा वेदनांची जाणीव करून देण्याची मागणी केली.