Desh

मदुराईमध्ये रस्ते कंत्राटदाराच्या कंपनीवर टाकलेल्या धाडीत; १०० किलो सोने; रोख १६३ कोटी जप्त

By PCB Author

July 17, 2018

मदुराई, दि. १७ (पीसीबी)  –  इनकम टॅक्स डिपार्टमेंटने मदुराई येथील एका रस्ते कंत्राटदाराच्या कंपनीवर टाकलेल्या धाडीत तब्बल १०० किलो सोन्याची बिस्किटे आणि १६३ कोटी रुपये रोख जप्त केले आहेत. सध्या ही धाड आजूनही सुरुच असल्याने बेहिशोबी संपत्तीचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही धाड सोमवार (दि.१६) चेन्नईतील रस्ते कंत्राटदार नागराजन सय्यदुरई यांच्या एसकेजी ग्रुप कंपनीवर टाकण्यात आली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी चेन्नईतील रस्ते कंत्राटदार नागराजन सय्यदुरई यांच्या एसकेजी ग्रुप कंपनीच्या २० वेगवेगळ्या ठिकाणांवर धाड टाकण्यात आली. यामध्ये इनकम टॅक्स डिपार्टमेंटने  तब्बल १०० किलो सोन्याची बस्किटे आणि १६३ कोटी रुपये रोख जप्त केले आहेत. सोमवारी पहाटे सुरू झालेली ही कारवाई अज मंगळवारी ही सुरूच राहणार आहे. यामुळे जप्तीच्या रकमेचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.