मदरशात राष्ट्रगीत बंधनकारक..

0
213

लखनऊ, दि. १२ (पीसीबी) : उत्तर प्रदेशात आता सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हणणं बंधनकारक करण्यात आलं आहे. वर्ग सुरु होण्याआधी सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत गावं लागणार आहे. आजपासूनच या नियमाची अंमलबजावणी होणार आहे. उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण परिषदेच्या रजिस्ट्रारने सर्व अल्पसंख्यांक कल्याण अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले आहेत.

मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हटलं जातंय की नाही याची पडताळणी देखील केली जाणार आहे. उत्तर प्रदेशांमध्ये सकाळी वर्ग सुरु होण्यापूर्वी दुआ पठण केलं जातं. पण आता दुआ पठणाबरोबरच राष्ट्रगीत म्हणणं हे देखील बंधनकारक असणार आहे.