मत्स्यविकास मंत्र्यांना माशातलं आणि मच्छीमार यातले काय कळतं; नितेश राणेचा जानकरांना टोला

0
395

मुंबई, दि, २२ (पीसीबी) – कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी ‘मागच्या पाच वर्षांत कोकणातील मच्छिमारांच्या प्रश्नांनी गंभीर स्वरूप घेतले आहे. ज्याला मासे आणि मच्छिमारी यातले काहीच कळत नाही, अशा व्यक्तीला मुख्यमंत्र्यांनी मत्स्यविकास खाते देऊन कोकणावर अन्याय केला’, अस म्हणत पशू, दुग्ध आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांच्यावर चांगलेच तोंडसूख घेतले आहे.

त्यांनी मच्छिमारांचे प्रश्न मांडत ‘कोकणातील पारंपरिक मच्छिमारांवर समुद्रात उडी घेऊन आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांचा राजीनामा घ्या, अन्यथा मत्स्य दुष्काळ तरी जाहीर करा’अशी मागणी राणे यांनी केली आहे.

दरम्यान नितेश राणे यांनी ‘मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात मंत्र्यांची नेमणूक करत असताना काहीतरी क्वालिफिकेशन पहायला पाहिजे. कुणालाही उचलून मंत्री करू नये..मोदींनी ज्याप्रमाणे परराष्ट्र खात्याचा मंत्री म्हणून परराष्ट्र खात्यातील अधिकाऱ्याला मंत्री केले, त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनीही ‘जानकार’ व्यक्तीलाच मंत्रीपद द्यावे’, अशी मागणी करत महादेव जानकर यांच्यावर टीका केली आहे.