Maharashtra

मतदान आम्हाला नाही करणार ह्याला काय अर्थ आहे?, – राज ठाकरे

By PCB Author

March 09, 2020

मुंबई, दि.९ (पीसीबी) – गेल्या १४ वर्षात आपण अनेक कामं केली, तरीही मतदानाच्या वेळेस लोक कुठे जातात कळत नाही, लोकांना कामाच्या अपेक्षा आमच्याकडून आहेत, पण मतदान आम्हाला नाही करणार ह्याला काय अर्थ आहे?,” असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी विचारला.

अनेकदा मला लोकांचंही कळत नाही. काम पाहून मतदान करतात की नाहीत हा प्रश्नच आहे. काम पाहून मतदान होणार नसेल तर विषयच संपला. जितकी आंदोलने मनसेने गेल्या १० वर्षात केली तितकी कोणीच केली नाहीत. आपण लोकांना निकालही दाखवून दिले. रेल्वे स्थानकांच्या बाहेरचे फुटपाथ मोकळे झाले. पण मतदान करायच्या वेळी सगळे कुठे जाते कळत नाही”. आपली खंत व्यक्त करताना अशावेळी अपेक्षा घेऊन करायचे काय ? अशी विचारणा त्यांनी केली. पण आपण महाराष्ट्राला बांधील आहोत असेही यावेळी ते म्हणाले.

गेल्या १४ वर्षात आपण अनेक कामं केली, तरीही मतदानाच्या वेळेस लोकं कुठे जातात हे कळत नाही, लोकांना कामाच्या अपेक्षा आमच्याकडून आहेत, पण मतदान आम्हाला नाही करणार ह्याला काय अर्थ आहे?
#मनसे_वर्धापनदिन #राज_ठाकरे_लाईव्ह

— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 9, 2020