Maharashtra

‘मतदानासाठी सेनेकडून फोन आले’; विनंतीमुळे मतदान केल्याचा छिंदमचा दावा

By PCB Author

December 28, 2018

अहमदनगर, दि. २८ (पीसीबी) – अहमदनगरमध्ये महापौरपदाची निवडणूक वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदम याच्या मतावरून गाजली. शिवसेनेचे उमेदवार बोराटे यांनी विनंती केल्यानुसारच आपण मतदान केल्याचा दावा छिंदमने केला आहे. यामुळे अहमदनगरमधील राजकारण तापले आहे.

शिवसेनेकडून फोन आल्याचा दावा करत श्रीपाद छिंदमने माध्यमांसमोर एक ऑडिओ क्लीप सादर केली. तर ही क्लीप बनावट असल्याचे बोराटे यांचे म्हणने आहे. शिवसेनेला बदनाम करण्यासाठीच भाजप आणि राष्ट्रवादीने छिंदमला शिवसेनेला मत देण्यास सांगितल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. दरम्यान, छिंदम याला सभागृहात झालेल्या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा आदेश पीठासन अधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला आहे. त्यानुसार फिर्याद नोंदविण्याचे काम सुरू आहे.