मतदानादिवशी एक्झिट पोलवर बंदी; निवडणूक आयोगाचा निर्णय  

0
495

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – महाराष्ट्र व हरियाणा  राज्यातील विधानसभा निवडणुकांसह १७ राज्यांमधील ५१ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांसाठी तसेच  महाराष्ट्रातील सातारा व बिहारमधील समस्तीपुर येथील लोकसभेच्या जागेसाठी  येत्या सोमवारी (दि. २१)  मतदान होणार आहे. यादिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत मतदानोत्तर चाचण्यांचे कल दाखवण्यास (एक्झिट पोल)  बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती भारतीय निवडणूक आयोगाने आज (मंगळवार) ट्विट करून दिली आहे.

महाराष्ट्र व हरियाणा येथील विधानसभा निवडणुकीसह अरुणाचल प्रदेश, आसम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, मध्‍यप्रदेश, मेघालय, ओदिशा, पुद्दुचेरी, पंजाब, राजस्‍थान, सिक्कि‍म, तामिळनाडू, तेलंगणा, उत्‍तरप्रदेश या १७ राज्यांधील ५२ विधानसभा मतदारसंघात व महाराष्ट्रातील सातारा आणि बिहारमधील समस्तीपुर लोकसभा मतदार संघात पोटनिवडणुक होणार आहेत.

या निवडणुकांचा २४ ऑक्टोबर रोजी निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या दिवशी मतदानाचा कल (ओपिनियन पोल), अन्य कल तसेच सर्वे दाखवण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे.