Pimpri

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मतदारांची सेल्फी  

By PCB Author

October 21, 2019

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) –   शहरातील चिंचवड, पिंपरी, भोसरी मतदारसंघातील विधानसभेच्या मतदानाला आज (सोमवारी)  सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. सर्व ठिकाणी नागरिकांचा मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मतदारांना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.

गेल्या दोन दिवसापासून शहर परिसरात पाऊस पडत आहे. मतदानाच्या दिवशी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभाग विर्तवला होता. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पावसाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सकाळीच मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी गर्दी केली होती.

सेलिब्रिटींनी ही मतदान करून लोकशाहीतील आपला हक्क बजावला. त्याचबरोबर नवमतदार असलेली तरूणाई ही मतदान करण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून आली. मतदान केल्यानंतर एकत्र येत तरूणांनी सेल्फी काढून सोशल मीडियावर व्हायरल केली. काही जणांनी कुटुंबियांसोबत येत मतदान करून सेल्फी काढली.