Chinchwad

मटका अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई

By PCB Author

May 09, 2021

चिंचवड स्टेशन, दि. ९ (पीसीबी) – आनंदनगर झोपडपट्टी जवळ सुरू असलेल्या कल्याण मटका अड्ड्यावर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई केली. यात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीस हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 8) सायंकाळी करण्यात आली.

संतोष बब्रु कांबळे (वय 35), मल्लेश हनुमंता म्हेत्रे (वय 30), शंकर सखाराम ठोकळ (वय 33, सर्व रा. चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस नाईक नामदेव राठोड यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदनगर झोपडपट्टी जवळ मालधक्का चौक येथे पिंपळाच्या झाडाखाली कल्याण मटका जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने शनिवारी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास पथकाने कारवाई केली. यात पोलिसांनी 4 हजार 510 रुपये रोख, 25 हजार 500 रुपयांचे 4 मोबाइल फोन, 10 रुपयांचे पेन आणि कल्याण मटका चिठ्ठ्या असा एकूण 30 हजार 20 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. चिंचवड पोलीस तपास करीत