Pimpri

मच्छिंद्र तात्या तापकीर फाऊंडेशनच्या वतीने ५०१ रोपांचे वाटप

By PCB Author

July 23, 2021

काळेवाडी, दि. २३ (पीसीबी) – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मच्छिंद्र तात्या तापकीर फाऊंडेशन यांच्यावतीने काळेवाडी तापकीर नगर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यात विविध देशी ५०१ झाडांच्या रोपांची लागवड व वाटप करण्यात आले.

यावेळी माजी विरोधी पक्ष नेते मच्छिंद्र तापकीर, युवानेते सागर तापकीर,सामाजिक कार्यकर्ते राजाराम शेळके,शिवाजी तेलंगे, शशिकांत वाखारे, नवनाथ देवकर, रिना वर्मा, नवनाथ गारगोटे, संतोष पानसरे,शिवाजी भांड, अत्तार बिलाल, सौदागर केमदारने,भोईटे संदीप,भीमराव लगड व संगीता पाटोळे,यासह परिसरातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मच्छिंद्र तात्या तापकीर फाउंडेशन च्या वतीने परिसरात चिंच लिंबू वड पिंपळ यासह विविध देशी जातीच्या वृक्षाच्या रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना मच्छिंद्र तापकीर म्हणाले वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवायचे असल्यास मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केली पाहिजे. त्यामुळे वातावरण दुषित होणार नाही व मानव प्राण्यास हानी पोहोचणार नाही त्यामुळे प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे व ते जगवले पाहिजे ही काळाची गरज आहे