‘…मग बुलेट ट्रेन फक्त गुजरातमध्येच धावेल’; रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांनी दिली महत्वाची माहिती

0
275

मुंबई, दि.२७ (पीसीबी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ठाणे महापालिकेनं बुलेट ट्रेनच्या थांब्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव गुंडाळून लावल्याने केंद्र राज्यातील बुलेट ट्रेनचं काम आता लांबण्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत. त्यामध्ये आता रेल्वे मंडळाचे अध्यक्षांनी जागा मिळण्यास विलंब झाल्यास फक्त गुजरातमध्ये बुलेट ट्रेन चालवण्याचे संकेत दिले आहेत.

बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पात ठाणे-दिव्यालगतच्या म्हातार्डी भागात स्थानक उभारण्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव ठाणे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने मागील आठवड्यात गुंडाळला. या मुद्यावर बोलताना रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यांनी महत्त्वाची माहिती दिली. “बुलेट ट्रेन प्रकल्प एकत्र करण्याची भारतीय रेल्वेची इच्छा आहे आणि त्यादृष्टीने आम्ही योजना तयार करत आहोत. महाराष्ट्र सरकारनं पुढील चार महिन्यात ८० जमीन उपलब्ध करून देण्याची हमी दिली आहे. जर प्रकल्पाला जागा मिळाली, तर बुलेट ट्रेन महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांमध्ये धावेल. त्याचबरोबर जर जागा उपलब्ध करून देण्यास उशिर झाला, तर पहिल्या टप्प्यात फक्त गुजरातमध्ये बुलेट ट्रेन चालवू शकतो का, याचीही तयारी आम्ही करत आहोत,” असं विनोद कुमार यादव म्हणाले.