मंदिरातील पुजाऱ्याचा खून करून दानपेटीतील रक्कम लंपास

0
430
(संग्रहित छायाचित्र)

बीड, दि.४ (पीसीबी) – मंदिरातील पुजाऱ्याचा खून करून दानपेटीतील रक्कम लुटून नेल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, दहिफळ वडमाउली येथे रविवारी पहाटे अज्ञात चोरटय़ांनी रेणुकादेवीच्या मंदिरात प्रवेश केला. या वेळी त्यांनी तेथील दानपेटय़ा फोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा पुजारी रामिलग महादेव ठोंबरे (वय ५५) यांना जाग आली. त्यांनी विरोध केला असता चोरटय़ांनी पुजारी ठोंबरे यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना जागीच ठार केले. त्यानंतर दानपेटय़ा फोडून त्यातील देणगीची रक्कम लुटली. सकाळी घटनेची माहिती कळताच केजचे पोलीस उपाधीक्षक अशोक आम्ले यांच्यासह ठाण्यातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी श्वान पथक, ठसे तज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते. मात्र अद्यापही त्याचा तपास लागला नाही.