मंत्री गिरीश बापट यांच्या सरकारी निवासस्थानाला लागलेली आग नियंत्रणात

0
767

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – पुण्याचे पालकमंत्री  गिरीश बापट यांच्या मुंबईतील सरकारी निवासस्थानाला  लागलेली आग आटोक्यात आणली आहे.  सोमवारी (दि. ११) रात्री  ९ च्या सुमारास आग लागल्यानंतर अग्निशामक दलाच्या पथकाने तातडीने १५ मिनिटांच्या कालावधीत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ बंगल्याच्या बाजूला असलेल्या बापट यांच्या ‘ज्ञानेश्‍वरी’ या बंगल्यात सोमवारी रात्री  आग लागली. बंगल्यात असलेल्या सर्व्हन्ट क्वार्टरमध्ये ही आग लागून    ‘ज्ञानेश्‍वरी’ बंगल्यात पसरली.

यानंतर अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी आले. या वेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. रात्री सव्वानऊच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमक दलाला यश आले. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही,  आग कशामुळे लागली, हे अद्याप  समजू शकलेले नाही, असे पोलिसांनी सांगितले.