Maharashtra

मंत्रालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

By PCB Author

August 01, 2018

मुंबई, दि. १ (पीसीबी) – अंगावर रॉकेल ओतून मंत्रालयासमोर एका महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना आज (बुधवार) सकाळी घडली.

राधाबाई साळुंखे (रा. बीड) असे या महिलेचे नाव असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधाबाई साळुंखे यांनी आज (बुधवार) सकाळी मंत्रालयासमोर स्वतःवर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. जमिनीचा निकाल विरोधात लागल्याने साळुंखे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. साळुंखे यांना पोलिसांनी वेळेतच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.