Pimpri

मंघनमल उधाराम महाविद्यालयात वृक्षारोपण

By PCB Author

July 26, 2021

पिंपरी,दि.२६(पीसीबी) – “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” हे ध्येय समोर ठेवून मंघनमल उधाराम वाणिज्य महाविद्यालयात अजून एकदा वृक्षारोपण व संवर्धन हा कार्यक्रम राबवण्यात आला.

या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. विनीता बसंतानी, पिंपरीचे कार्यक्षम नगरसेवक श्री. हिराचंद (डब्बू) आसवाणी, नगरसेविका सौ. निकिता कदम, समाजसेवक श्री. राजू आसवाणी त्याचबरोबर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. लिना सुनिल मोदी हजर होत्या.या कार्यक्रमात एकूण १० आयुर्वेदिक वृक्षांची लागवड करण्यात आली. मागील दोन आठवड्यात महाविद्यालयाकडून एकूण ४० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.