मंगळावर आढळले पाण्याचे भूमिगत तलाव

0
1028

न्यूयॉर्क, दि. २६ (पीसीबी) – मंगळावर शास्त्रज्ञांना पहिल्यांदाच पाण्याचे भूमिगत तलाव आढळले आहे. यामुळे या ग्रहावर आणखी मोठ्या प्रमाणात पाणी व जीवसृष्टी असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. 

मार्टियन बर्फाच्या स्तराखाली असलेले हे तळे तब्बल २० किमी रुंद असल्याचे एका अमेरिकी संशोधन नियकालिकात प्रसिद्ध झालेल्या इटालियन संशोधकांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मंगळावर सापडलेला आत्तापर्यंतचा हा सर्वांत मोठा जलसाठा असल्याचे सांगण्यात येते. मंगळ ग्रह सध्या थंड, ओसाड आणि कोरडा असला तरी तो उबदार आणि काहिसा ओलसरही आहे. ३.६ अब्ज वर्षांपूर्वी येथे भरपूर पाणीसाठा आणि पाण्याची तळी असावीत, असा संशोधकांचा अंदाज आहे.