मंगळवार, २३ नोव्हेंबर रोजी गिरीश प्रभुणे यांचा नागरी सत्कार

0
469

पिंपरी, दि.१९ (पीसीबी) : समाजसुधारक गिरीश प्रभुणे यांना नुकताच भारत सरकारच्या वतीने पद्मश्री किताब प्रदान करण्यात आल्याप्रीत्यर्थ समाजसुधारक गिरीश प्रभुणे गौरव समिती (पिंपरी-चिंचवड) यांच्या वतीने मंगळवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२१ रोजी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सायंकाळी ठीक पाच वाजता ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या हस्ते भव्य कृतज्ञता नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका महापौर उषा उर्फ माई ढोरे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, ह.भ.प. डॉ. नारायणमहाराज जाधव यांची प्रमुख अतिथी म्हणून या सोहळ्यात उपस्थिती राहील.

महाराष्ट्र साहित्य परिषद (भोसरी शाखा) महाराष्ट्र साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड शाखा), महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य-कला अकादमी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (पिंपरी-चिंचवड शाखा), लायन्स क्लब भोजापूर गोल्ड, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ, कलारंग प्रतिष्ठान, बंधुता प्रतिष्ठान, शब्दधन काव्यमंच, अक्षरभारती, समरसता साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड शाखा), भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान, स्वयंसिद्धा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, साहित्य संवर्धन समिती पिंपरी-चिंचवड, दिलासा संस्था, पिंपरी-चिंचवड साहित्य मंच, गुणवंत कामगार विकास समिती, पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती, गझलपुष्प पिंपरी-चिंचवड, सावित्रीच्या लेकींचा मंच, भूगोल फाउंडेशन (भोसरी), स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड), शिक्षकमित्र जिव्हाळा परिवार (भोसरी), ज्येष्ठ नागरिक संघ (चिंचवडगाव), एल्गार साहित्य परिषद, आशिया मानवशक्ती विकास संस्था, कष्टकरी संघर्ष महासंघ, स्वानंद महिला संस्था (पिंपरी-चिंचवड) अशा सुमारे एकतीस संस्थांच्या सहभागातून संपन्न होणाऱ्या या विनामूल्य सोहळ्याचा लाभ सर्व नागरिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाचे समन्वयक पुरुषोत्तम सदाफुले आणि मुरलीधर साठे व Adv सतिश गोरडे यांनी केले आहे.