मंगळवारी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग दोन तासांसाठी बंद

0
504

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर उद्या मंगळवार (दि.९) दुपारी १२ ते २ यावेळेत दोन तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे, अशी माहिती महामार्ग सुरक्षा पथकाने दिली आहे.

द्रुतगती मार्गावर ओव्हर हेड गॅन्ट्री (फलक) बसविण्याचे कामकाज करण्यात येणार आहे. यासाठी दुपारी १२ ते २ यावेळेत पुणे लेनवर हा ब्लॉक असणार असून वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे. हलकी चारचाकी आणि इतर प्रवासी वाहने ही द्रुतगती मार्गावरील कुसगाव टोलनाका येथून जुना मुंबई-पुणे महार्गाने पुण्याकडे वळवण्यात येणार आहेत, याची नोंद प्रवासी आणि चालकांनी घ्यावी असे आवाहन महामार्ग सुरक्षा पथकाने केले आहे.