Desh

भ्रष्टाचाराच्या आरोपात लालूप्रसाद यादव पुन्हा कोठडित

By PCB Author

May 20, 2022

पटना, दि. २० (पीसीबी) – चारा घोटाळा प्रकरणातून जामिनावर कारागृहाबाहेर आलेल्या लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यांच्यासोबतच त्यांच्या मुलीविरोधातही सीबीआयने कारवाई केली आहे. सीबीआयने लालू आणि त्यांच्या मुलीविरोधात आपल्या कार्यकाळामध्ये भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाखाली कारवाई केली आहे.

सीबीआय़ने लालू प्रसाद यांच्या निवासस्थानावर छापा टाकला आहे, जे सध्या राबडीदेवी यांचं निवासस्थान म्हणून ओळखलं जातं. गेल्या महिन्यामध्येच लालूप्रसाद यांना झारखंड कोर्टाने चारा घोटाळा प्रकरणात जामीन दिला होता.

त्यानंतर ते काही दिवस एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. त्यानंतर ते आपली मोठी मुलगी मीसा भारती हिच्या घरी आहेत. सुनावणीच्या आधीच तब्येत बिघडल्याने लालूंना एयर अँब्युलन्सने दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.