भोसरी विधानसभा भाजप युवती आघाडीच्या उपाध्यक्ष पदी धनश्री जुवेकर

0
628

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – भोसरीतील चक्रपाणी वसाहत येथील धनश्री जुवेकर यांची भोसरी विधानसभा भारतीय जनता पार्टी युवती आघाडीच्या उपाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते धनश्री जुवेकर      यांना निवडचे पत्र देण्यात आले. यावेळी पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पार्टी युवती आघाडीच्या अध्यक्षा तेजस्विनी कदम उपस्थित होत्या.