भोसरी येथे तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न

0
318

भोसरी, दि. २२ (पीसीबी) – एमआयडीसी भोसरी येथील गुलाब पुष्प उद्यान गवळीमाथा येथे फिर्यादी अच्युत मधुकर राऊत रा. गवळीमाथा (वय ५०) यांना शिवीगाळ करुन डोक्यात सिमेंटचा गट्टु मारुन गंभीर जखमी करण्यात आले आहे.

पोलिसींनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अच्चुत राऊत आपल्या मित्रांसोबत दिलीप लक्ष्मण वाघमारे, संजय भोसले आणि विठ्ठल करडे सर्व राहणार गवळीमाथा भोसरी हे गुलाबपुष्म मैदानासमोरील फुटपाथवर मेंढीकोट पत्ते खेळत असतांना आरोपी मुस्ताक सय्यद (वय ५५) हे सदर ठिकाणी येऊन फिर्यादी यांच्याकडे रागीट नजरेने बघत दोन ते तीन वेळा आवती भवती वेढा घालुन सिमेंटचा गट्टु फिर्यादी यांच्या डोक्यात मारला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून आरोपीने “मी तुला आता सोडणार नाही, तुला मी जीवे मारुन टाकेल” अशी धमकी देत तेथुन पळ काढला.

यावेळी पोलिसांना माहिती समजताच आरोपीला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास एमआयडीसी पोलिस करीत आहे.