Banner News

भोसरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क

By PCB Author

October 21, 2019

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांनी सोमवारी (दि. २१) मतदानाचा हक्का बजावला. त्यांनी पत्नी व माजी महापौर मोहिनी लांडे यांच्यासह भोसरी, लांडेवाडी येथील राजमाता जिजाऊ महाविद्यालयातील मतदान केंद्रावर मतदान केले.

पिंपरी-चिंचवड शहतील चिंचवड, भोसरी आणि पिंपरी या तीनही विधानसभा मतदारसंघात सोमवारी (दि. २१) सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांनी भोसरीतील जिजाऊ महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर सकाळी मतदानाचा हक्का बजावला.

माजी आमदार लांडे यांनी पत्नी व माजी महापौर मोहिनी लांडे यांच्यासह मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे.  मतदारांनी घरी न बसता बाहेर पडून हे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे. तसेच जास्तीत जास्त मतदान करून मतदानाची टक्केवारी वाढवावी, असे आवाहन माजी आमदार लांडे यांनी मतदानानंतर केले.