भोसरी बालाजीनगर येथे सराईताला एक पिस्टल आणि दोन जीवंत राऊंडसह अटक; तर पिस्टल पुरवणाऱ्याला निगडीतून अटक

0
1638

भोसरी, दि. ६ (पीसीबी) – खुनाचा प्रयत्न आणि दरोडा या सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या एका सराईत आरोपीला एक पिस्टल आणि दोन जीवंत राऊंडसह दरोडा आणि खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी अटक केली आहे. तसेच आरोपीला पिस्टल पुरवणाऱ्या देखील अटक करण्यात आली आहे. ही कारवाई आज (मंगळवार) भोसरी बालाजीनगर येथील खालची मजिद समोर आणि राहुलनगर निगडी येथे करण्यात आली.   

लखन कुमार गायकवाड (वय २७, रा. जे.३३६ कंपनीसमोर, पावर हाऊस चौक, बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) आणि त्याला पिस्तुल पुरवणाऱ्या जमील उर्फ अब्दुल छट्टन शेख (वय ४३, रा. राहुलनगर, निगडी, मुळ. रा. नजीबाबाद जामा मजिद, इस्टील गल्ली, जि. बिजनोर, रा. उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. या दोघांवर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी खंडणी-दरोडा विरोधा पथक भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील बालाजीनगर येथे गस्त घालत होते. यावेळी पोलीस शिपाई नितीन खेसे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली कि, बालाजीनगर झोपडपट्टी, खालची मजिद समोर एक इसम संशयीतरित्या उभा असून त्यांच्याजवळ पिस्टल सारखे हत्यार आहे. पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी सापळा रचून तेथे उभा असलेला सराईत आरोपी लखन गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक पिस्टल आणि दोन जिवंत राऊंड आढळून आले. पोलिसांनी ते जप्त करुन आरोपी लखन याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने ती पिस्टल निगडी राहुलनगर येथे राहणारा सराईत आरोपी जमील शेख याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. यावर पोलिसांनी तातडीने शेख यांच्या घरी जाऊन त्याला अटक केली. या दोघांवर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करत आहेत.