Bhosari

भोसरी बालाजीनगर येथील तडीपार गुंडाला अटक

By PCB Author

October 26, 2018

भोसरी, दि. २६ (पीसीबी) – तडीपारीच्या आदेशाचा भंग करुन पुन्हा परिसरात फिराणाऱ्या एका सराईत गुंडाला गुन्हे शाखा युनिट १ च्या पोलीसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.२५) करण्यात आली.

पिंटु अनिरुध्द जाधव (वय २७, रा. बालाजीनगर, झोपडपट्टी) असे अटक करण्यात आलेल्या तडीपार गंडाचे नाव आहे. त्याच्यावर कलम १४२ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी भोसरी परिसरात गुन्हे शाखेचे युनिट १ चे पथक मोटार सायकल चोरीचा तपास करत होते. यावेळी पोलीस शिपाई सागर शेंडगे यांना त्यांच्या खबऱ्या मार्फ माहिती मिळाली कि भोसरी बालाजीनगर येथील एक सराईत आरोपीला दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले होते. मात्र तो पुन्हा त्या परिसरात फिरत आहे. यावर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने भोसरी एमआयडीसी येथील बालाजीनगर झोपडपट्टीमध्ये सापळा रचून सराईत आरोपी पिंटू जाधव याला अटक केली. तसेच त्याला भोसरी एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देऊन त्याच्यावर कलम १४२ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.