Bhosari

भोसरी एमआयडीसी येथे भरधाव कारच्या धडकेत वृध्दाचा मृत्यू

By PCB Author

November 09, 2018

भोसरी, दि. ९ (पीसीबी) – भरधाव कारने मागून दिलेल्या जोरदार धडकेत एका ५७ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि.८) रात्री साडेआठच्या सुमारास भोसरी एमआयडीसी येथील श्री. महावी टाईल्स कंपनी प्लॅट नं. १७८/२ यांच्या समोरील रस्त्यावर घडली.

शेरबहादुर काशीराम भंडारी (वय ५७, रा. रामदेव इंजिनिअरिंग डब्ल्यू १८७, इंद्रायणीनगर, भोसरी, मुळ रा. लमकीनगर, जिल्हा कैलाली, नेपाळ) असे मयत वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास भोसरी एमआयडीसी येथील श्री. महावी टाईल्स कंपनी प्लॅट नं. १७८/२ यांच्या समोरील रस्त्यावरुन शेरबहादुर पायी चालले होते. यावेळी मागून (एमएच/१४/ईपी/७१४९) या क्रमांकाच्या टाटा झेस्ट कारचालकाने शेरबहादुर यांना जोरदार धडक दिली आणि पसार झाला. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शेरबहादुर यांचा जागीच मृत्यू झाला. भोसरी एमआयडीसी पोलीस आरोपी कारचालकाचा शोध घेत आहेत.