भोसरी एमआयडीसी येथे तीन टन गोमांसासह दोघांना अटक

1182

भोसरी, दि. १२ (पीसीबी) – तीन टन गोमांसाने भरलेला टेम्पो मुंबईला घेऊन निघालेल्या दोघा जणांना भोसरी एमआयडीसी पोलीसांनी आज (सोमवार) पहाटे दोनच्या सुमारास भोसरी एमआयडीसी येथील भारत माता चौकात अटक केली.

गणेश शांताराम कुऱ्हाडे आणि शाहरुख शौकत पठाण (दोघे रा. आळेफाटा, जुन्नर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे एका आयशर टेम्पोमधून तीन टन गोमांस मुंबईला नेले जाणार अशी माहिती हिंदू आघाडीचे गोरक्षण प्रमुख व मानद पशुकल्यान अधिकारी शिवशंकर स्वामी यांना मिळाली होती. त्यानुसार आज पहाटे दोनच्या सुमारास भोसरी एमआयडीसी येथील भारत माता चौकात पोलिसांच्या मदतीने सापळा रचून (एमएच/४८/एजी/६७२६) टेम्पोला आडवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये तीन टन गोमांसा आढळून आले. पोलिसांनी ते टेम्पोसहीत जप्त केले आणि चालक गणेश आणि क्लिनर शाहरुख या दोघांनी अटक केली. या दोघांवर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.