भोसरी एमआयडीसी येथे कुत्र्याला हाकलायला सांगितल्याच्या रागातून मालकाने नग्न होऊन महिलेसमोर केले अश्लिल चाळे

0
754

भोसरी, दि. १९ (पीसीबी) – एका महिलेच्या लहान मुलीच्या अंगावर पाळीव कुत्र आल्याने. तिने मुलीला त्या कुत्र्याला दगडाने हाकलून लावण्यास सांगितले. यावर चिडलेल्या कुत्र्याच्या मालकाने पूर्ण नग्न होऊन महिलेसमोर अश्लिल चाळे करत शिवीगाळ करुन तिचा वियभंग केला. ही धक्कादायक घटना गुरुवारी (दि.१८) सकाळी दहा ते साडेदहाच्या सुमारास भोसरी एमआयडीसी येथे घडली.

याप्रकरणी २९ वर्षीय महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अतुल शरद राजगुरु (वय २८) याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी दहा ते साडेदहाच्या सुमारास फिर्यादी २९ वर्षीय महिला त्यांची जाऊ आणि एक शेजारील महिला या त्यांच्या घराच्या दारात उन्हाळी पदार्थ बनवत बसल्या होत्या. यावेळी महिलेची लहान मुलगी तेथेच सायकल खेळत होते. इतक्या शेजारी राहणाऱ्या आरोपी अतुल याने त्याचे पाळीव कुत्र मोकळ सोडल. हे कुत्र मुलीच्या अंगावर आल. यामुळे महिलेने दगड मारुन कुत्र्याला हाकलून लावण्यास मुलीला सांगितले. यावर रागावलेला अतुल हा त्या महिलेसमोरच नग्न झाला आणि अश्लिल चाळे करत शिवीगाळ करुन वियभंग केला. याप्रकरणी आतुल याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक एस.बी.दरेकर तपास करत आहेत.