Bhosari

भोसरी एमआयडीसी येथून तडीपार गुंडास अटक

By PCB Author

November 20, 2018

भोसरी दि. १९ , (पीसीबी) –  रेकॉर्डवरील एका सराईत गुंडाला  गुन्हे शाखेकडील खंडणी आणि दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे.  ही कारवाई सोमवार (दि.१९)  भोसरी एमआयडीसी येथील फर्न हॉटेलच्या समोर करण्यात आली.

चाँद गफुर शेख (वय २५, रा. महात्मा फुले नगर एमआयडीसी, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.  त्याला परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्तांनी  पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी खंडणी आणि दरोडा विरोधी पथक देहू गाव परिसरात गस्तीवर असताना पोलीस शिपाई सागर शेंडगे यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली की, भोसरी  एमआयडीसी येथील रेकॉर्डवरील तडीपार गुंड चाँद शेख हा भोसरी येथील फर्न हॉटेलच्या समोर येणार आहे.  पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी सापळा रचून  चाँद शेख याला ताब्यात घेतले  आणि पुढील कारवाईसाठी भोसरी  पोलिसांकडे  सुपूर्द केले.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन , अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे,  सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  खंडणी आणि दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  सुधीर अस्पत,  पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बडे,  पोलीस कर्मचारी अजय भोसले राजेंद्र शिंदे किरण काटकर सागर शेंडगे आणि विक्रांत गायकवाड यांच्या पथकाने केली.