भोसरी एमआयडीसी येथील सेंच्युरीएंका कंपनीला भीषण आग

0
642

भोसरी, दि. २१ (पीसीबी) – भोसरी एमआयडीसी येथील सेंच्युरीएंका कंपनीला आज (मंगळवार) सकाळी दहाच्या सुमारास भीषण आग लागली.

घटनेची माहिती मिळताच वल्लभनगर अग्निशमन विभागाचे दोन, भोसरी, प्राधिकरण, तळवडे अग्निशमन दलाचे प्रत्येकी एक, बजाज कंपनी आणि हिंजवडी एमआयडीसी अग्निशमन विभागाचे एकूण आठ बंब घटनास्थळी दाखल झाले. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजु शकलेले नाही. तसेच घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.