Bhosari

भोसरी एमआयडीसीत पेंटरला लोखंडी रॉडने मारहाण

By PCB Author

May 17, 2019

भोसरी, दि. १७ (पीसीबी) – तिघा जणांच्या टोळक्यांनी एका पेंटरला लोखंडी रॉड आणि रिंग पान्याने जबर मारहाण करुन जखमी केले. ही घटना गुरुवार (दि.१६) रात्री दिडच्या सुमारास भोसरी एमआयडीसीतील क्लालिटी सर्कल ते विश्वेश्वर चौक दरम्यान घडली.

करण रघुनाथ कांबळे (वय २३, रा. दत्तमंदीरा शेजारी, भोसरी) असे जखमी पेंटरचे नाव आहे. याप्रकरणी त्याने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बापु वाघमारे (रा. बालाजीनगर, भोसरी) आणि त्याच्या दोन अज्ञात साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री दिडच्या सुमारास भोसरी एमआयडीसीतील क्लालिटी सर्कल ते विश्वेश्वर चौक दरम्यान आरोपी बापु वाघमारे आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून फिर्यादी पेंटर करण कांबळे यांना लोखंडी रॉड आणि रिंग पान्याने जबर मारहाण केली. या घटनेत करण याच्या डोक्याला आणि पायाला इजा झाली आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.