भोसरी एमआयडीसीत पादचाऱ्याचा मोबाईल आणि रोख चोरट्यांनी केली लंपास

0
442

भोसरी, दि. १४ (पीसीबी) – रस्त्याने पायी चालेल्या एका तरुणाला अडवून तीघा जणांच्या टोळक्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याच्याकडील १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि २ हजारांची रोख असा एकूण १४ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना शनिवारी (दि.१३) रात्री साडेआठच्या सुमारास भोसरी एमआयडीसीतील टेल्को मटेरिअल गेटच्या रस्त्यावर घडली.

याप्रकरणी भुषण सुनिल महाजन (वय २०, रा. बालाजी इंडस्ट्रीज एफ-२, १८/६, भोसरी एमआयडीसी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात तिघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास भुषण भोसरी एमआयडीसीतील टेल्को मटेरिअल गेटच्या रस्त्यावरुन चालले होते. यावेळी अज्ञात तिघा चोरट्यांनी त्यांचा रस्ता अडवला तसेच जिवे मारण्याची धमकी देवून त्यांच्याकडील १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि २ हजारांची रोख असा एकूण १४ हजारांचा ऐवज चोरुन नेला. पोलिस उपनिरीक्षक जे.एस.गिरनार तपास करत आहेत.