भोसरी एमआयडीसीत ताबं आणि कांस्याच्या ५२ हजारांच्या व्हायरी चोरट्यांनी केल्या लंपास

0
542

भोसरी, दि. १४ (पीसीबी) – कंपनीत कामासाठी आणलेल्या ताबं आणि कांस्याच्या तब्बल ५२ हजार ३९० रुपयांच्या व्हायरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. ही घटना प्लाझ्मा टेक्नॉलॉजिस, ई १०/१९ बी३, ई ब्लॉक, एमआयडीसी भोसरी या कंपनीत घडली.

याप्रकरणी बालाजी रघुनाथ चव्हाण (वय ४३, रा. प्लॉट क्र. ५, विंग बी हरीओम अपार्टमेंट, दिघी रोड, ) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार (दि.६) ते रविवारी (दि.७) या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी भोसरी एमआयडीसीतील प्लाझ्मा टेक्नॉलॉजिस, ई १०/१९ बी३, ई ब्लॉक या कंपनीतील ताबं आणि कांस्याच्या तब्बल ५२ हजार ३९० रुपयांच्या व्हायरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.